पाच शहर नक्षल्यांच्या टार्गेटवर ; नक्षलवाद विरोधी मोहिम चे प्रमुख,नागपूर चे पोलीस महानिरीक्षक,संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

पाच शहर नक्षल्यांच्या टार्गेटवर ; नक्षलवाद विरोधी मोहिम चे प्रमुख,नागपूर चे पोलीस महानिरीक्षक,संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.


एस.के.24 तास


नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे अशी माहिती आता समोर आली आहे.सरकार विरोधात असंतोष निर्माण केला जाण्यासाठी हे केलं जाणार आहे.मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर आणि गोंदिया या पाच शहरांमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याचा कट रचला आहे. 

नागपूर चे पोलीस महानिरीक्षक,संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

काय म्हटले आहे संदीप पाटील यांनी ?

“ CPI माओवादी जे आहेत त्यांचाच एक भाग आहे युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट हे शेतकरी, विद्यार्थी यांच्यामार्फत शासनाविरोधात रोष निर्माण करणं हे या युनायटेड फ्रंटचं काम आहे. ज्यांना आपण शहरी माओवादी म्हणतो. त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये त्यांनी त्यांचं नेटवर्क तयार केलं आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पेरणं सुरु आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या ५४ संस्था आमच्या रडारवर आहेत. ” ही माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली.

कोणत्या पाच शहरांवर नक्षल्यांचं आहे लक्ष ?

नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रातल्या पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर,गोंदिया ही शहरं नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे आयजी संदीप पाटील यांनी टीव्ही ९ मराठीला ही माहिती दिली . समाजात सरकारविरोधी असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत असंही त्यांनी सांगितलं.


सीपीआय माओइस्ट या बंदी घातलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट ही शाखा राज्यातल्या पाच शहरांमध्ये आंदोलनं आणि घातपात घडवणार असल्याचं समजतं आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुलं नक्षली चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहेत. 


पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवलं होते.तसंच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत.अशी ही माहिती पाटील यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !