महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव(भोसले) येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती तथा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०२/२४ महाराष्ट्र विद्यालय , पिंपळगांव (भोसले)ता. ब्रह्मपुरी येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती तथा वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे सर होते तर प्रमुख अतिथी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री टिकारामजी ढोरे, श्री मस्के सर,श्री पुरी सर,श्री महाले सर,श्री,सडमाके सर,श्री घ्यार सर उपस्थित होते.
कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानिमित्त गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला .
तसेच मार्च २०२४च्या एसएससी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव कथन केले, वर्ग १०पर्यंत नीतिमत्ता शिक्षण, कौशल्य विकासावर उपक्रम,विविध स्पर्धा , सर्वांगिण विकासासाठी व्यासपीठ मिळते
आणि त्यांचा फायदा भविष्यामध्ये करून घेऊ असे आपल्या मनोगतातून नमूद केले ,पाहुण्यांनी कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या निर्मूलन,स्वच्छता अभियान, समाजातील जातीभेद या गुणावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे आयोजन वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांनी केले, सूत्रसंचालन कुमारी बनकर हिने केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी राऊत मॅडम यांनी केले.सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.