दरबारातील सत्कार माझा नसून माझ्या कार्याचा सत्कार आहे. - सहकार महर्षी प्रकाश सावकर पोरेड्डीवार

दरबारातील सत्कार माझा नसून  माझ्या कार्याचा सत्कार आहे. - सहकार महर्षी प्रकाश सावकर पोरेड्डीवार      

                                            

अमरदीप लोखंडे, सहसंपादक. 


ब्रम्हपुरी - २६/०२/२४ माणसाने नेहमी चांगले कार्य करीत राहिले पाहिजेत.आपल्या चांगल्या कार्याची पावती समाज आपोआप देत असतो. आज पर्यंत माझ्या हातून सत्कार्य करीत आहे व पुढे पण करीत राहीन.त्यामुळे आज माझ्या कार्याची पावती म्हणुन दरबारने दिली आहे.अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोलीच्या उर्स मुबारक कार्यक्रमात जो सत्कार करण्यात आला तो सत्कार माझा नसून माझ्या कार्याचा सत्कार आहे असे प्रतिपादन प्रकाश सावकार पोरेड्डीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली यानी केले.                                                                         

अल्हाज हज़रत सैय्यद मोहम्मद इकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बु) ता.ब्रम्हपुरी आयोजित " उर्स मुबारक " व शानदार कव्वाली कार्यक्रमाच्या  प्रसंगी विशेष अतिथि म्हणून अम्मासाहेबा, शफिबाबा ,शरीफबाबा,मनोहरजी पाटिल पोरेटी मा.उपाध्यक्ष जी.प.गडचीरोली ,कृष्णाभाऊ गजभे आमदार आरमोरी


प्रकाश सावकार पोरेडीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली,मा.मनोहरजी चंद्रिकापुरे आमदार  अर्जुनी-मोरगांव, तुषार सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, राजेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे वडसा, मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गड़चिरोली मा.घनश्याम कावळे नागपुर,मा.रामदासजी मसराम काँगेस नेता वडसा,अरविंद जयस्वाल, प्रल्हादजी धोटे वडसा,नामदेवजी कुथे जेष्ट नागरिक चिंचोली,मा.रोशन दीवटे.  चिचोली,परसरामजी टीकले माजी स.पं.स.वडसा व अन्य मान्यवरानी बाबाजान संदर्भात अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.                                                                                            

अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान चिशती चिंचोली येथे अम्मासाहेबा, शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गर्शनाखाली दरवर्षी उर्स् मुबारक व दरबारी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजेंद्रजी बत्रा तर आभार प्रदर्शन वसंतराव गोगल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान  दरबारी सेवक, सार्वजनिक मंडळ चिंचोली बु., पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार व पोलिस कर्मचारी, गावातील पुरुष, महीला, युवक मंडळ तसेच भक्तगण यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !