शैक्षणिक सहल ट्रॅक्टर मधून नेताना रस्त्यात अपघात१३ विद्यार्थी जखमी.
मुल : मुल तालुक्यातील मोरवाही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाची परवानगी न घेता माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून शैक्षणिक सहलीला नेले. वाटेतच ट्रॅक्टर उलटल्याने १३ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११:३० वाजता चिखलीजवळ घडली.
मोरवाही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग असून एकूण ७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षण समितीच्या सभेत नागपूर येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्याचे ठरले.मात्र, काही कारणास्तव नागपूरऐवजी कन्हाळगाव येथे शैक्षणिक सहल नेण्याचे ठरविण्यात आले.
सहलीसाठी गट शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, येथील मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेता ६८ विद्यार्थ्यांना माल वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरमध्ये कोंबून नेत असताना ट्रॅक्टर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाटेतच ट्रॅक्टर उलटला.यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
त्यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शिक्षकांवर कारवाई करणार का पंचायत समिती चे बि.डी.ओ.सर्वांचे लक्ष लागले आहे.