जि.प्रा.उच्च शाळा केंद्र,येवली कु.सांची बारसागडे हिच्या वाढदिवस निमित्ताने नोटबुक,पेन देऊन वाढदिवस साजरा.

जि.प्रा.उच्च शाळा केंद्र,येवली कु.सांची बारसागडे हिच्या वाढदिवस निमित्ताने नोटबुक,पेन देऊन वाढदिवस साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,14/02/2024 जि.प्रा.उच्च शाळा,केंद्र येवली जिल्हा,गडचिरोली येथे निराधार निराश्रित जिल्हा अध्यक्ष,सौ,प्रीती लिखित बारसागडे येवली यांची कन्या कु.सांची लिखित बारसागडे वर्ग - 4 था हिचा 10 वाढदिवस शाळेमध्ये  साजरा करण्यात आला.

केंद्रस्तरीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा दर्शनी माल येथे 3 दिवस घेण्यात आले होते.त्यात मुलींचा खो-खो व प्राथमिक मुलांचा खो-खो यात विशेष प्राविण्य मिळवून तालुकास्तरावर निवड झाली होती.


खेळ खेळून जिंकून आले असता त्यानिमित्ताने कु. सांची लिखित बारसागडे वाढदिवसानिमित्ताने बुक व पेन वाटप करून खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री, खोब्रागडे सर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कु.सांची लिखित बारसागडे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले.


शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.निमसरकार सर,गराटे मॅडम,निकुरे मॅडम,मोगेवार मॅडम,कु.सांची हिला दीर्घायुष्याच्या उत्तम आरोग्य उच्च शिक्षणाच्या खूप खूप शुभेच्छा दिले.शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी कु.सांची हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.


शाळेतील विद्यार्थ्यांना बुक व पेन वाटप झाल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळेस उपस्थितीत शाळेचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते.शाळेतील वातावरण प्रफुल्लित झाले होते.आणि तसेच कुसुम ताई आलाम,निराधार निराश्रित विभाग प्रदेश सरचिटणीस गडचिरोली,दर्शना क्षीरसागर,उज्वला मेश्राम,डॉ. राहुल ढोके,बिट्टू टिकले,दीपक टिकले,व सांची च्या परिवारातील असंख्य शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !