मान.मिलिंद बी.खोब्रागडे यांना नागपूर येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रधान.
एस.के.24 तास
गडचिरोली : ११ फेब्रुवारी २०२४ रोजी साहित्य दर्पण कला मंच, नागपूरच्या वतीने एकदिवसीय पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. मंचच्या संस्थापिका मान. कल्पणाताई टेंभुर्णीकर, नागपूर व मान. प्रा. नानाजी रामटेके सर, आरमोरी, जि. गडचिरोली ह्यांनी संमेलन आयोजित केलेला होता.
ह्यामध्ये वडसा, देसाईगंजचे सध्या गडचिरोलीत वास्तव्यास असणारे मिलिंद बी.खोब्रागडे यांना पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांच्या सामाजिक,सांस्कृतीक व शैक्षणिक कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
अनेक पुरस्काराचे मानकरी मिलिंद बी.खोब्रागडे हे एक सामाजिक जाणिवेचे कवी,लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कार्याबद्दल समूहाच्या संस्थापिका मान. कल्पनाताई अशोक टेंभूर्णीकर, संस्थापक प्रा. नानाजी रामटेके, मान. संगिताताई भाऊसाहेब जामगे , मान. अशोक टेंभूर्णीकर, मान. प्रा. डॉ.सुनंदा जुलमे, मान. विनोद जाधव, मान.नरेंद्र पवार, मान. कैलास धोंडने, मान. मालाताई मेश्राम, मान. प्रितीबाला ताई बोरकर, मान. लोपामुद्राताई शहारे, मान. अर्चना चव्हाण, मान. सुभाष मानवटकर, मान. पुष्पाताई नानाजी रामटेके, मान. रंजनाताई शहारे यांनी अभिनंदन केले आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिसरात प्रियजणांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच अनेक राज्यभरातून आलेले ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.