शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या ; ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील घटना.


शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या ; ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील घटना.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१२/०२/२४ तालुक्यापासून अवघ्या ५ किमी. अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना दि.12 फेब्रुवारी २४  सकाळी ७-०० वाजता दरम्यान उघडकीस आली.


प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी जयदेव पिल्लेवान वय ६० वर्ष रा.मालडोंगरी व मृतक पत्नी हिरकन्या जयदेव पिल्लेवान वय वर्ष 50 यांच्यात घटनेच्या दिवशी पत्नीने जयदेव ला शिवीगाळ केल्याचे जनमानसात बोलल्या जात होते.दोघा पती-पत्नीत मागील  २,३ दिवसापासून रोज भांडण होत होते. 


 दि.11 फेब्रुवारी ला रात्री 11.00 वा दरम्यान फिर्यादी मजलग जॉकीस जयदेव पिल्लेवान (30)याला आरोपी व मृतक भांडण करताना दिसले.हे भांडण नेहमीचेच  समजून फिर्यादीने लक्ष्य दिले नाही.मात्र  सकाळी 7.00 वा जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50)  ही मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.

        

फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी  जयदेव पिल्लेवान वय (60)याचेवर  अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.


घटनेचा तपास पोलीस निरीक्षक,अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !