निंबाळा येथे नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन.

निंबाळा येथे नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत कळमना अंतर्गत मौजा निंबाळा येथे २५२५ (१२३७) निधी अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की ग्रामपंचायत कळमना अंतर्गत येत असलेल निंबाळा येथे विविध विकास कामे करून हे गाव स्वच्छ सुंदर व हिरवगार, पर्यावरण मुक्त करून स्मार्ट केल्या शिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी याकामात सहकार्य करावे. 

          


या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे,निंबाळा चे पोलिस पाटील गोपाल पाल, जेष्ठ नागरिक महादेव मेक्षाम, नामदेव देवाळकर, चदरु चिंचोलकर, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते निलकंठ मोडघरे, दिवाकर मोडघरे, राजेश देवाळकर, दौलत मोडघरे, मारोती देवाळकर, प्रशांत पेदोर, रविंद्र पिंपळकर, गोविंदा मोडघरे, विजय पादे, शंकर चिंचोलकर  यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !