माजी मंत्री,महादेव जानकर यांचे समता परिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार.

माजी मंत्री,महादेव जानकर यांचे समता परिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने आयोजित रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ,समाज प्रबोधन मेळावा व आरोग्य तपासनी शिबीर  दि.21फरवरी 2024रोजी मूल तालुक्यातील जुनासूरला जिल्हा चंद्रपुर येथे  आयोजित करण्यात आला होता. 


त्या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एससी,एस टी,ओबीसी, व्ही जे एन टी चे नेते बहूजनाचा बुलंद आवाज आमदार महादेवराव जानकर साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, 


मागील वर्ष भरात महाराष्ट्रात ओबीसी  एल्गार परिषदेच्या माध्यमातून ओबीसी नेत्या सह संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला ,ओबीसी  समाजासाठी लढा देत आहेत.ओबीसी समाजासाठी योगदान बघून ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रपुर जिल्हा सहसचिव नंदू बारस्कर,प्रदिप वाढई मंगेश मोहूरले,निकूरे व अन्य समता परिषदेचे कार्यकर्तेनी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !