कुर्झा जि.प.शाळेत रंगला लहानग्यांचा सांस्कृतिक महोत्सव : शाळा समितीचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०८/०२/२४ ब्रह्मपुरी च्या कुर्झा वार्डातील जिल्हा परिषद बालवाडी व प्राथमिक शाळेत लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत संपन्न झाले.
यात या सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटक ब्रह्मपुरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक विलास विखार यांनी केले.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रिताताई उराडे होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख कवी डॉ,धनराज खानोरकर, प्रमुख उपस्थितीत नगरसेविका सपना खेत्रे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय विखार, प्रकाश बावनकुळे, खुशाल विखार, मोहनिस उराडे,गोकुल सहारे,राजू उराडे इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.यात एकल नृत्य,नकला, समूह नृत्य ,बालगीत,बडबडगीत, एकांकिका असे अनेक कार्यक्रम लहानग्यांनी सादर करुन रसिकांचे मनं जिंकले.सर्वांना योग्य असे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोंगले सरांनी तर संचालन व आभार वंजारी सरांनी केले.यशस्वीतेसाठी शाळा समितीचे अध्यक्ष धनंजय विखार,उपाध्यक्ष धनपाल सांगोळे,गोपाल बावनकुळे,राजू बावनकुळे, अशोक उईके,रोशनी खेडकर ,प्रियांका कांबळे,सौ.गायधने, सौ.वैद्य,गीता आंबेरकर, मुख्याध्यापक गोंगले सर ,सहाय्यक शिक्षक वंजारी सर, शिक्षणप्रेमी कुमारी तेजल खेत्रे व कुमारी दिशा सेलोकर यांनी मोलाचे सहकार्य केले.