गडचिरोली हुन नागपूर बसस्थानकात आलेल्या एसटी बस मध्ये बॉम्ब नसून अग्निशमन यंत्र होते.

 


गडचिरोली हुन नागपूर बसस्थानकात आलेल्या एसटी बस मध्ये बॉम्ब नसून अग्निशमन यंत्र होते.


एस.के.24 तास


नागपूर : गडचिरोली हून नागपूर मध्यवर्ती बसस्थानकात आलेल्या एसटी बसमध्ये बॉम्बसदृश बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली.सुमारे सहा तास नागपुरातील सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या होत्या. मात्र, संबंधित बॉक्सच्या विश्लेषणानंतर त्यात बॉम्ब नसून ते अग्निशमन यंत्र असल्याचे समोर आले.आश्चर्याची बाब म्हणजे, पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनादेखील तपास पथकांनी सुरुवातीला त्यात विस्फोटके असल्याची माहिती दिली होती.


संबंधित बस १ फेब्रुवारीला गडचिरोलीहून नागपुरात आली. बुधवारी बस मेन्टेनन्ससाठी आगारात आली. दुपारी तंत्रज्ञाला क्लीनर च्या सीटखाली संशयास्पद बॉक्स दिसला.


त्याने कंट्रोल रूमला याची माहिती दिली. पुढे सुरक्षा आणि तपासणीचे काम यंत्रणांकडून सुरू झाले.रात्री उशिरा त्यात कुठलाही बॉम्ब किंवा विस्फोटके नसून एका कंपनीचे अग्निशमन यंत्र असल्याचे लक्षात आले. धोक्याची शक्यता लक्षाप्त घेऊन पोलिसांनी तातडीने बस आगारातील एक पूर्ण भाग रिकामा केला.


गणेशपेठेत असा प्रकार झाल्याचे कळताच दहशतवादविरोधी पथक,बीडीडीएस, गुन्हे शाखा, विशेषशाखेच्या पन्नासहून अधिक अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !