अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांची कारवाई.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,24/02/2024 ब्रह्मपुरी वरून मेंडकी- एकारा मार्गे जनावरांना कोंबून ट्रक जात असल्याची गुप्त माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल जीट्टावार यांनी आपल्या सहका-यासह सापळा रचून नवेगाव वनविभाग नाक्यासमोर नाकाबंदी केली. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात जवळपास १४नग बैल व २६ गाई एकुण ४० नग अंदाजे किंमत रुपये- ६,००,०००/-आदिलाबाद येथे कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेत असताना पकडले.
एम. एच. ३४ ए बी ६६२९ या क्रमांकाच्या ट्रक मध्ये बैल आणि गाई कत्तलीसाठी नेल्या जात होत्या सदर ट्रक अशोक लेलँड कंपनी, बारा चाकी असून किंमत रुपये-१४,५०,०००/- जनावरे आणि १२चाकी ट्रक दोन्ही मिळून ची किंमत एकूण २०,५०,०००/- वीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ट्रक चालक शेख हरुन शेख फकीर अहमद वय वर्ष 25 राहणार इलियास नगर पाण्याचे टाकीजवळ तालुका नागोळकोंडा जिल्हा आदिलाबाद हल्ली मुक्काम वाकडी हनुमान मंदिराजवळ तालुका जिल्हा कागज नगर तसेच मोहम्मद मुलतानी हाजी कासिम वय वर्ष ३५ धंदा जडाऊ लाकूड स्टॉल शिवाजी नाईट स्कूल मागे छोटी खदान नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांचे वर कलम ५(अ )(ब )महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सह कलम ११(डी) (एफ )प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ८३/ १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस हवालदार पवन डाखरे दुमाजी घुटके, अजय कटाईत,अजय नागोसे, खुशाल उराडे ,मांदडे यांनी केली.