संविधानाला बदलविण्याची भाषा करणाऱ्यांनी हात लावला तर त्याचे हात तोडून टाकू. ★ संविधानाचे रक्षण करण्यासाठी जो आमच्या सोबत तर आम्ही त्यांच्या सोबत राहू. - प्रा.जोगेंद्र कवाडे

संविधानाला बदलविण्याची भाषा करणाऱ्यांनी हात लावला तर त्याचे हात तोडून टाकू.


★ संविधानाचे रक्षण करण्यासाठी जो आमच्या सोबत तर आम्ही त्यांच्या सोबत राहू. - प्रा.जोगेंद्र कवाडे


एस.के.24 तास


सावली : संविधान बदलवून पाहणार्‍यांनी संविधानाला हात लावला तर त्याचे हात तोडून टाकू.यासाठी आपल्या एक जुटीची ताकद दाखवा.संविधानाचे रक्षक करण्यासाठी जो पक्ष आमच्या सोबत राहील तर आम्ही त्याच्यासोबत , पिरिपा तत्व बदलविणारा पक्ष नाही.२१ वर्षापासुन बंदिस्त असलेला नि फंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा आज रमाई जयंतीच्या दिवशी आम्ही खुला केला त्यांचे अनावरण करण्यात आले. 

आज खऱ्या अर्थाने रमाई ला निफंद्रा वासियांनी वाढदिवसाची गिफ्ट दिलेली आहे.तिन टक्के मनुवादी लोका कडून होणारे बौद्ध बांधवारीलअन्याय अत्याचार आम्ही कदापिही खपवून घेणार नाही.भोतमांगे प्रकरणात ह्या जोगेंद्र कवाडेनी आमदारकीचा राजीनामा दिला. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी निफंद्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कार्यक्रमात केले.


सावली तालुक्यातील  निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाप्रसंगी कांग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.नामदेवराव किरसान म्हणाले की , भाजपाने जातीयवादाचा,भ्रष्टाचाराचा, बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे.अश्या सरकाराला खाली खेचण्याची वेळ आलेली आहे. संविधानाचे रक्षण करणाऱ्यासाठी आपल्या एकजुटीची ताकद येत्या लोकसभा निवडणुकीत आपणाला दाखवायची आहे. 


याप्रंसगी रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपूरे यांनी निफंद्रा येथील डॉ.आंबेडकराच्या पुतळ्याचे कश्या प्रकारे आज अनावरण झाले याचा लेखाजोगा मांडला व तहसिलदार,पोलीस विभाग् आणि गावकर्‍याचे सहकार्य लाभले त्यामुळे त्यांचे आभार मानले याप्रसंगी माजी जि.प.बा.स.दिनेश चिटनूरवार ' पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,इंडो मेत्ता फाऊंडेशन नागपूर च्या स्मिता वाकडे,रिपाईचे जेष्ठ नेते शिद्धार्थ सुमन,सरपंच पुरसोतम नवघडे,आदिनी आपले डॉ.आंबेडकरा प्रती विचार मांडले.मंचकावर प्रा. जोगेंद्र कवाडे ' 


डॉ.नामदेव किरसान,दिनेश पा.चिटनुरवार,गोपाल रायपूरे,साहित्यीक स्मिता वाकडे,प्रा.मुनिश्वर बोरकर , शिद्दार्थ सुमन,पिरिपाचे हरिष दुर्योधन,रिपाईचे बाजीराव उंदिरवाडे,माजी सभापती,यशवंत बोरकुटे,कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,पिरिपाचे सुमेध मुरमाडकर, पिरिपाचे उत्तम गेडाम,रिपाईचे कोमल रामटेके,संतोष रामटेके,पिरिपाचे मानिक डोंगरे,प्रमोद सरदारे,रोशन उके,रिपाईचे किशोर उंदिरवाडे,लोमेश सोरते, उपसरपंच नानाजी उंदिरवाडे आदि उपस्थित होते.


 याप्रंसगी पंचशिल बौद्ध समाज मंडळ निफंद्रा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोपाल रायपुरे,प्रा.मुनिश्वर बोरकर यांचा सत्कार केला. 


रात्रौ शेषराज खोब्रागडे आणि त्यांचा संच चंद्रपूर यांचा भिमगिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन रतन निमगडे, अमित वाकडे यांनी तर आभार संतोष रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गुणवंत ढोलणे,विलास जनबंधू,हेमराज ढोलणे,तुलाराम उंदिरवाडे,प्रशांत ढोलणे आदिचे मोलाचे सहकार्य लाभाले.पोलीसांच्या चोख बंदबस्तात बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !