सत्य,नीती,पारदर्शी छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज जयंती महोत्सव. - डॉ .धनराज खानोरकर

सत्य,नीती,पारदर्शी छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज जयंती महोत्सव. - डॉ.धनराज खानोरकर


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,२१/०२/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) " ज्याचे नाव घेतांना छाती अभिमानाने फुलून जाते,मराठी माणूस नतमस्तक होते ते म्हणजे आदर्श राजे शिवाजी होत.त्यांनी स्वकष्टाने स्वराज्य मिळविले.रयतेचे सर्वंकष संरक्षण केले.महिला, शेतकरी,कष्टकरी अशा वंचितांच्या बाजूने सदैव उभे राहून एक आदर्श निर्माण केला.महाराष्ट्र धर्म जागविला.मराठी माणूस जगविला.असे सत्य,नीती पारदर्शी छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज होत." असे बहूमोल मार्गदर्शन कवी डॉ धनराज खानोरकरांनी केले.ते  ब्रह्मपुरी येथील महालक्ष्मी नगर कुर्झा वार्डात शिवाजी महाराज जयंती उत्सवात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

    

विचारपीठावर मार्गदर्शक म्हणून डॉ मोहन कापगते, मंडल अधिकारी पितेश्वर येरमा, आयोजक शरद जिभकाटे, लक्ष्मण जिभकाटे,नाना गभणे व इतर मान्यवर उपस्थित होते.शिवघोषणा देत व महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

    

यावेळी डॉ कापगतेंनी, शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र रक्षणकर्ता,सर्व क्षेत्राकडे बारकाईने लक्ष देणारे खरे रयतेचे राजे होते असे म्हटले तर येरमांनी, आपण शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन काही उत्तम कार्य केले पाहिजे,असे विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शरद जिभकाटेंनी केले.यानंतर शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व वार्डवासियांना सहभोजन देण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !