प्रिती बारसागडे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस " निराश्रित विभागाच्या" जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस निराश्रित निराधार विभागाचे जिल्हाध्यक्ष सौ.प्रतीताई बारसागडे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्राधान्य करण्यात आले . व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल प्रितीताई बारसागडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्ष मा.राधिका मखामले, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष,महेंद्र ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ नामदेव किरसान,निराधार विकास विभागाच्या प्रदेश सरचिटणीस कुसुमताई अलाम, गडचिरोली काँग्रेस कमिटी महीला अध्यक्ष कविताताई मोहरकर, इत्यादी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल मंगला कुळसंगे,सुनीता उसेंडी,सुनीता राऊत, दर्शना क्षीरसागर,विद्या पराते,मंगलाताई कोवे,अपर्णा खेवले,निता तलांडी, सह समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रीती ताई बारसागडे यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिले.