चक्क व्हाॅट्सअप ग्रुॅप ॲडमिन ने शिवतीर्थाला नेली सहल.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२७ /०२/.२४ काळानुसार गरज आणि गरजेनुसार व्यवहार नवीन तंत्रज्ञाच्या आधारे विकासात्मक वाटचाल नवीन तंत्रज्ञानाच्या युगात संदेशवहनाचे कार्य व्हाट्सअप च्या माध्यमातून सुरू होऊ लागले.
हौशी लोकांनी व्हाट्सअप खोलून ग्रुप ॲडमिन झाले त्या ग्रुपला अनेक सभासद जोडले एकमेकांची सुखदुःखांची , जगातील घडामोडींची देवाणघेवाण करू लागले.हे फक्त मोबाईल च्या मेमरी पुरते ठरते.परंतु याला अपवाद हा एक व्हाट्सअप ग्रुप ठरला तो म्हणजे " सेकंडइनिंग " ग्रुप ब्रह्मपुरी.
सेकंडइनिंग या व्हाट्स अॅप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन शरद ठेंगरे पाटील आणि मित्र परिवार यांनी आपल्या ग्रुपच्या सर्व सभासदांना एकत्र जोडण्याकरता सर्वांचा परिचय व्हावा या हेतूने सहलीचे आयोजन केले आणि सेकंड इनिंग या व्हाट्सअप ग्रुप ची सहल " शिवतीर्थ " या ठिकाणी हवा बदल व शिवतीर्थ या परिसरातील परिसराचे अवलोकन करण्याकरता जाऊन आनंदमय चेहऱ्यावर भाव घेऊन स्वगावी ब्रह्मपुरी ला माघारी आली.