परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान.
दशरथ कांबळे - प्रतिनिधी मुबंई
मुबंई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण हॉल, घणसोली आगार, नवी मुंबई येथे योगेश कडुसकर (परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन तिरुपती काकडे (पोलिस उपआयुक्त (वाहतूक) नवी मुंबई), हेमांगिनी पाटील (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई), संजय बोंडे (वाहतूक निरीक्षक), विश्वास भिंगारदिवे (सहाय्यक पोलिस निरक्षक), विनय मोरे (सारथी सुरक्षा सेवा), अमोल मिसाळ (सलाम फाऊंडेशन- व्यसनमुक्ती), मे. महालक्ष्मी मोटर ट्रान्सपोर्ट प्रा. लि. राम मोहन रेड्डी, जे.बी.एम. जनरल मॅनेजर तसेच परिवहन उपक्रमातील अधिकारी विवेक अचलकर (कार्यकारी अभियंता), उमाकांत जंगले (मुख्य वाहतूक अधिकारी), सुनिल साळुंखे (वाहतूक अधिक्षक), निवृत्ती सिताप (अगार व्यवस्थापक), जीवन माने (कनिष्ठ अभियंता) तसेच राजेश जगताप (अभियंता) इ. मान्यवर उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत नमुंमपा परिवहन उपक्रमातील सर्व वाहन चालकांकरिता प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी तिरुपती काकडे (पोलिस उपआयुक्त - वाहतूक) यांनी अपघातामुळे कुटुंबावर होणारा परिणाम, वाहतूकीचे नियम, बस ताब्यात घेतांना घ्यावयाची काळजी, मिरर पोझिशन, ब्लांईंड स्पॉट कव्हर विषयीची माहिती, शिटींग पोझिशन व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी तसेच अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. अशा अनेक विषयांवर चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले.