जि.प.शाळा,कळमना येथे दुरुस्ती कामाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, नंदकिशोर वाढईंच्या हस्ते भूमिपूजन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जिल्हा परिषद शाळा येथे १५ लक्ष रुपये निधी च्या वर्ग खोल्या दुरुस्ती कामाचे भुमीपुजन नंदकिशोर वाढई उपक्रमशील स्मार्ट सरपंच कळमना तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की गावाचा सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. गाव विकासात महत्त्वाचा केन्द्र बिंदू म्हणजे शाळा असते. येथूनच देशाचा सुजन नागरिक घडत असतो. चांगले संस्कार, निश्चितच जिवन ध्येय गाठण्यासाठी मदत करणाऱ्या शाळेची देखभाल दुरुस्ती ही आवश्यक आहे. त्यामुळे या कामाला विशेष प्राधान्य दिले.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रा. प. सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना पिंगे, ग्रा. पं. सदस्य दिपक झाडे, सुनिता उमाटे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामसेवक मरापे, श्रावण गेडाम, महादेव ताजणे,मुख्याध्यापक दुधे मॅडम, उध्दव पा आस्वले,प्रशांत पेदोर निंबाळा,पेंदोर सर, गोखरे मॅडम, विठ्ठल पाटील वाढई,सुरेश आस्वले, मनोहर कावळे,शामराव चापले, राजु उमाटे, देवानंद आस्वले, मंदा गेडाम,शालुना उमाटे,शोभा आत्राम शिपाई विशाल नागोसे, सुनील मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.