टेकडामोटला ता.सिरोंचा येथील असंख्य युवक -युवती आणि नागरिकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.
★ सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करनाऱ्या भाजप ला घरचा आहेर दाखवा.- डॉ.नामदेव किरसान
एस.के.24 तास
सिरोंचा : टेकडामोटला ता.सिरोंचा येथे काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. वाढती महागाई - बेरीजगारी,भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण या सारख्या असंख्य भाजपच्या हुकूमशाही धोरनाला कंटाळुन, काँग्रेस पक्ष श्रेष्ठीवर विश्वास ठेवून आगामी काळात जिल्ह्यात-राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याकरिता टेकडामोटला (असरअल्ली ) येथील असंख्य युवक - युवती आणि नागरिकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार पेंटारामा तलांडी,काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्व्यक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, माजी समाज कल्याण सभापती सौ. सगुनाताई तलांडी, बनय्या जंगम, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमन्त मडावी, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, महिला काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिंरोचा सतीश जवाजी, उपसरपंच रामचंद्र गोगल, राजेश पडला गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी, महिला युवकांची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवून घरचा आहेर दाखवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून केले.पुढे बोलतांना ते म्हणाले, महागाई - बेरोजगारी सारख्या असंख्य समस्यांना बगल घालून भाजप कडून धार्मिक ध्रुवीकरन केल्या जात आहे, समाजा- समाजात, धर्मा - धर्मात तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यांना आता मतदानाच्या माध्यमातून धडा शिकविन्याची वेळ आलेली आहे.
पक्ष प्रवेश करणाऱ्यामध्ये राज पागे,धनंजय पागे, सुमन गोगुला, समय्या मोरला, नागेश गोगुला, चालपत जाडी, आनंदराव गोगुला, व्यंकटेश गोगुला, सडवली आईला, श्रीधर अंगाला, बापू जाडी, मनोहर गोगुला, नागेश अंबाला, समय्या गोगुला, अंबाला बनाय्या सह असंख्य युवक- महिला आणि नागरिकांचा समावेश होता.