चक्क २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी करणारा राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक.
एस.के.24 तास
राजुरा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन - लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली.विशेष म्हणजे एका लाच प्रकरणात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.
राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची व्यवस्था केली होती.मात्र,पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते.फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत विरुर महावितरण कार्यालय अंतर्गत येते व विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र देवराव चांदेकर यांच्या अंतर्गत येते. विद्युत पुरवठा सुरळीत -सुरू ठेवण्यासाठी चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. – शुक्रवारी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर यास अटक केली.आरोपी विरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.