आरसा...
रूप असली नकली
दावी फक्त तो आरसा
खरेखुरे प्रतिबिंब
लपवत ना फारसा...!
असे वैसे दिसेजैसे
खोटं नाही बोले कधी
रूप नश्वर आहेच
गर्व सोडून दे आधी...!!
रूप साजिरे गोजिरे
वरवर सुंदरता
कोण्या कामाची असेल
जप आधी शालीनता...!!
न्याहाळता आरश्यात
मानवाचे व्यक्तिमत्व
हुबेहूब प्रतिकृती
त्याला असेल महत्व..!!
विचाराची रुपकाता
असे ज्यांचे कडे थोडी
त्यास आरसा पाहणे
नाही वाटत हो गोडी...!!
रूपा बरोबर असे
शील संपत्तीला अर्थ
तेव्हा मनुष्य जीवनी
थोडा तरी ऊरे सार्थ...!!
कवी : - संगीता रामटेके पाटील,गडचिरोली