युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी. - निखिल सुरमवार
★ व्याहाड खुर्द येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :- २९ फेब्रुवारी २०२४ तालुक्यातील मौजा.व्याहाड खुर्द येथे विपीएल कबड्डी प्रो.व्याहाड खुर्द यांच्या तर्फे ५५ किलो वजन गटातील खेळाडूंसाठी भव्य रात्रकालीन मुलांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रसंगी स्पर्धेचे उदघाटन मा.प्रशांत पाटील चिटणुरवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली,सहउद्घाटक मा.नरसिंग गणवेणवार व्याहाड खुर्द,अध्यक्ष म्हणून सौ.सुनिताताई उरकुडे सरपंच व्याहाड खुर्द,प्रमुख उपस्थिती मा.निखिल सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली यांचा हस्ते पार पडले.
स्पर्धेच्या उदघाटना उपस्थित युवकांना प्रोत्साहीत करताना कृषी उत्पन्न सावली बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार यांनी युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी असे प्रतिपादन केले.
यावेळी मा.केशव भरडकर माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,मा.संजय मजोके,मा.टोंगे गुरूजी,मा.राजू टोंगे ग्रामपंचायत सदस्य, मा.हरीश चिवंडे ग्रामपंचायत सदस्य , मा.करणेवार गुरूजी,मा.पुंडलिक मडावी ग्रामपंचायत सदस्य ,मा.तेजस पुनवटकर, मा.अनिकेत शेडमाके व गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.