कळमना येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य तथा विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य नंदकिशोर वाढई हे होते.
प्रमुख अतिथी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रा. प. सदस्य रंजना पिंगे, सुनिता उमाटे, नुतन आत्राम, महादेव आबिलकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष क्षावण गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. ते प्रजेच्या कल्याणासाठी काम करायचे आणि प्रजा देखिल त्यांच्यासाठी पुर्ण समर्पन करायला तयार असायची. त्यांच्या सारखा कर्तुत्ववान दुसरा राजा जगामध्ये निर्माण झाला नाही.
त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता, गणीमी कावा, शेतकऱ्यांबदल असलेली आपुलकी, सुनियोजित कार्य, प्रचंड इच्छाशक्ती अशा अनेक गोष्टीतून प्रेरणा घेऊन सर्वांनी जीवन सफल करावे असे आवाहन केले. या प्रसंगी विठ्ठल पाटील वाढई, सुरेश गौरकार, मदन वाढई, भुषण ताजणे, अरुण आस्वले, अमोल निमकर, प्रशांत ताजणे, नितेश पिंगे अनिकेत कुकडे, क्षिकात कुकुडे, शुभम वाढई, नयन वाढई, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन राजेश क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन श्रावण गेडाम यांनी केले.