का येतो दीक्षाभूमी..?
एस.के.24 तास
प्रेरणेलाही नवप्रेरणा मिळावी अशी चेतना आहे दीक्षाभूमी,
लिहिन्यासाठी ऊर्जा प्रज्ञेची मला
प्रदान करते दीक्षाभूमी.
बऱ्याचदा वाटते, विषय संपले.
काय लिहू,लिहिन्याचे आशय संपले.
लेखनीला माझ्या तेव्हा संपदा शब्दांची
प्रदान करते दीक्षाभूमी.
कधी वाटते,
नेहमीच का फुले,शाहु,आंबेडकर
कधी वर्णन प्रेमकथांचेही करावे,
अनेक उपमांनी वर्णन प्रेयसीचे करावे.
पन बुद्धात एवढे गुंतते मन
की प्रेयसीहुनी अपार प्रेम मला
प्रदान करते ती दीक्षाभूमी.
तृष्णा सारुन सम्यक मार्गांनी
वंदनेचे आहे त्रिसरण दीक्षाभुमी,
सुटलाच तोल कधी मनाचा तेव्हा
पंचशील प्रदान करते दीक्षाभूमी.
- अमित चंद्रप्रभा प्रल्हाद वाकडे रा.जांब बुज ता.सावली जि. चंद्रपुर मो.नं.९७६४३७८०८३