वटफळी येथे धम्म परिषद संपन्न ; धम्मभुषण पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित.
एस.के.24 तास
यवतमाळ : महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती चे वतीने वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.भदन्त सुमेध बोधी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तरअतिथी म्हणुन भिक्खू संघातील शंभर भन्ते,गुणवंत देवपारे,उमेशकुमार मैत्री,एस व्ही.साठे आदिची उपस्थिती होती.
बौद्ध धम्म चळवळीत सक्रियपणे सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रबुद्ध भारत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल इतिहासिक बौध्द धम्म परिषदेत. धम्मभुषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्याचे सामाजीक कार्यकर्ते गोपाल रायपूरे यांनाही धम्मभुषण पुरस्कार प्रा.भदन्त सुमेध बोधी महाथेरो यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.सदर धम्म परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन धम्म बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.