विरखल(चक) येथील कँसरग्रस्त महिलेस आर्थिक मदत. ★ विजयकिरण फाउंडेशन चा सामाजिक उपक्रम,विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे मदत.

विरखल(चक) येथील कँसरग्रस्त महिलेस आर्थिक मदत.


★ विजयकिरण फाउंडेशन चा सामाजिक उपक्रम,विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,२५फेब्रुवारी २०२४ गोर गरीब जनतेच्या सैदव पाठीशी असणारे,जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनतर्फे विरखलं (चक) येथील कॅन्सरग्रस्त महिलेस,जेष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी माजी जि.प सदस्य मा.पांडुरंगजी तांगडे, माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजि गोहणे यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.


मौजा.विरखल(चक) गावातील कॅन्सरग्रस्त रुग्ण वर्षा डांबाजी चाल्लीरवार वय ४५ वर्षे ह्या घरातील कर्तबगार कुटुंब प्रमुख महिला असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, बऱ्याच दिवसापासून प्राथमिक उपचार करीत होत्या परंतु वारंवार त्यांना अस्वस्थ जाणवत होते.


उपचारदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधुन आर्थिक मदत मिळवून दिली,त्यांच्या वतीने त्यांचे सासरे मा.मनोहर चाल्लीरवार यांनी मदत स्वीकारली.


सदर आर्थिक मदत देताना युवक काँग्रेस कार्यकर्ता विरखल मा.ईश्वर गंडाते,पाथरी शहर अध्यक्ष मा.मोहित मेश्राम,ग्राम काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष लताताई वदलकोंडावार,मा.पुंडलिक ठाकरे,सौ.योगिता भसारकर,आशाताई ठाकरे,मा.सतीश उंदीरवाडे,वर्षाताई काटलाम,मा.जगदीश ठीकरे,मा.मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !