डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे चंद्रपूर ग्रंथोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी, चंद्रपूर द्वारा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव- २०२३ ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे दि.२४/२५ फेब्रु.२४ ला आयोजित करण्यात आले.सकाळी ठीक ८-०० वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथून निघालेल्या ग्रंथ दिंडीचे पूजन सन्मा. विनय गौंडा जिल्हाधिकारी , चंद्रपूर , सन्मा.विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी,चंद्रपूर,सन्मा.मुमक्का सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक ,चंद्रपूर यांनी ग्रंथ दिंडीचे विधीवत पूजन केले.
दोन दिवसीय झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने , सांस्कृतीकार्य, चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांनी मा .डॉ. शरदचंद्र सालफळे ज्येष्ठ शल्यचिकित्सक व साहित्यिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले. ग्रंथोत्सव कार्यक्रमात परिसंवाद ,कथाकथन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , कवी संमेलन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
आज झालेल्या कवी संमेलनात प्रदीप देशमुख, धनंजय साळवे, प्रदीप हेमके, अमरदीप लोखंडे ब्रह्मपुरी ,डॉ.सुधीर मोते, विजय वाटेकर अविनाश पोईनकर , डॉ.प्राध्या.श्याम मोहरकर चंद्रपूर डॉ.प्राध्या.धनराज खानोरकर ब्रह्मपुरी, किशोर मुगल , रेवानंद मेश्राम व अन्य कवींनी सहभाग नोंदवून एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थित कवी रसिकांची मने जिंकली.
सदर कवी संमेलन किशोर मुगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.कवितेचे सूत्रसंचालन अविनाश पोईनकर यांनी आपल्या बहारदार शैलीत सादर करीत उपस्थित श्रोत्यांवर आपल्या भाषेचा ठसा उमटविला.सदर कार्यक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा डॉ.प्राचार्य शाम मोहरकर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.