आयटक म.रा.आ.खा.आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना तर्फे. ★ मा.ना.राजे धर्मराव बाबा आत्राम,अन्न व औषध प्रशासन मंत्री,महाराष्ट्र राज्य निवेदन देण्यात आले.

आशा स्वयंसेविका निवेदन देताना...

आयटक म.रा.आ.खा.आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना तर्फे.


 ★ मा.ना.राजे धर्मराव बाबा आत्राम,अन्न व औषध प्रशासन मंत्री,महाराष्ट्र राज्य निवेदन देण्यात आले.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


चामोर्शी : दि. 03/02/024 रोजी चामोर्शी येथील पंचायत समिती मध्ये आयोजित शासकीय आढावा बैठकी दरम्यान तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांच्या राज्य भर सुरु असलेल्या वेतनवाढ आंदोलना संदर्भात निवेदन देण्यात आले.


१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय न काढल्यामुळे दि. २९/१२/२०२३ पासून ऑनलाईन कामावर बहिष्काराबाबत.


२) मंजुर केलेल्या मागण्यांचा जि.आर. दि. १२/०१/२०२४ पूर्वी न काढल्यास दि. १२/०१/२०२४ पासुन राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत.


३) आयटकच्या नेतृत्वात जि.प. कार्यालय समोर दि. १२/१/२०२४ रोजी धरणे व निदर्शने, 


४) दि.१५/१/२०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाद्वारे आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहेत.


राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे सदर हजार आशा स्वंयसेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गट प्रवर्तक कार्यरत आहेत.आशा स्वंयसेविका व गटप्रर्वकांनी दि.१८/१०/२०२३ ते दि. ०९/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता.

या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात मा, आरोग्य मंत्री यांनी दि.०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति समितीसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत मा.आरोग्य मंत्री यांनी खालील निर्णय घेवुन घोषणा केली होती.


१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रू. २००० दिवाळीपुर्वी देण्यात येणार.

 २) आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात रू. ७००० ची वाढ, 

३) गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रू. ६२०० ची वाढ.


आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पुर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मा, आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन,मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.


गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता मा.नरहरी झिरवळ,उपाध्यक्ष विधानसभा, म.रा. यांनी मा. मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्याकरती। शिफारस केली. दि.०९/११/२०२३ रोजी मा. अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक मा. खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली.


या बैठकीत मा. मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मा. मिलींद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरून गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरून १०००० रूपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत केल्याचे जाहीर केल्यामुळे दि. १०/११/२०२३ पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरूवात केली.


 तसेच आ.भा.कार्ड काढणे,गोल्डन कार्ड काढणे,पीएमएमव्हीवायचे फार्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत.


संप स्थगीत होवुन दीड महिना होवुन गेला परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. मा. आरोग्यमंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात दि. १८/१२/२०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परीणामी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि. २९/१२/२०२३ पासुन ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकत आहेत.


मा.आरोग्य मंत्री व मा. मुख्यमंत्र्याच्या आदेशावरून आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबतीत खालीलप्रमाणे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत


1) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रू. २००० दिवाळीपुर्वी देण्यात येणार.


2) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रू. ७००० ची वाढ


3) गटाप्रवर्तकांच्या मोबदल्यात रू. १०००० ची वाढ


 4) आशा व गटप्रवर्तक महिलांना नेमूण दिलेल्या कामाशिवाय व मोबदला दिल्याशिवाय त्यांच्याकडून योजनाबाहा कामे करूवून घेऊ नये.


5) ग्रामविकास विभाग यांचे शासन परिपत्रक दि. ३१ मार्च २०२० व दि. ४ जून २०२० तसेच आपले कार्यालयीन पत्र दि. २६/३/२०२१ व दि. ११/११/२०२१, दि. २८/९/२०२२, दि. २१/६/२०२३, दि. १८/१०/२०२३ नुसार ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना काळातील दरमहा रु. १०००/- प्रोत्साहन भत्ता दि. १ एप्रिल २०२० ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकीत आहे. तो तात्काळ त्यांना अदा करण्यात यावा.


 6) नगर विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक ३ ऑगस्ट २०१५, २८ मार्च २०२० व १४ सप्टें. २०२० च्या शासन निर्णयानुसार कोवीड १९ च्या अनुषंगाने नागरी भागात काम करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थावरील आशा व गट प्रवर्तकांना कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून मार्च २०२० ते ऑक्टो. २०२२ पर्यंत दरमहा रु. १०००/- अदा करण्यात यावे.


7). जिवती तालुक्यातील पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांची दर दिवशी ओपीडीला नियमबाह्य पद्धतीने ड्युटी लावल्या जाते ती बंद करण्यात यावी.


8) आशा व गटप्रवर्तक कर्मचान्यांच्या ऑक्टो. २०२३ पासून राज्यसरकारच्या वाढीव मानधन मोबदला


थकीत आहे. तो तातळीने अदा करण्यात यावा.


वरील मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय दि. १२/०१/२०२४ पुर्वी निर्गमित करण्यात यावेत. अन्यथा दि. १२/०१/२०२४ पासुन राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील. 


हीच संपाची कायदेशीर नोटीस समजावी. तसेच आपल्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर दि. ११/१/२०२४ रोजी धरणे व निदर्शने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१५/१/२०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन आयटकच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. 


करीता त्वरीत मागण्या मंजूर करण्यात याव्यात अश्या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदन देण्यात आले.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक  जास्त संख्येने उपस्थित होत्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !