तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज. - नितीन गोहणे
★ घोडेवाही येथे डे - नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन राजे क्रिडा मंडळ घोडेवाही यांचा उपक्रम.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : दिनांक,१५ फेब्रुवारी २०२४ तालुक्यातील मौजा घोडेवाही येथे राजे क्रिडा मंडळ ,घोडेवाही यांचातर्फे भव्य -नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज त्याचे उध्दघाट्न सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उध्दघाट्न सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.संजय दुधे, उपसरपंच घोडेवाही मा.चेतन रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पालं,मा.महादेव वाढई सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,मा.शिंदे सर मुख्याध्यापक घोडेवाही,मा.विशाल वाढणकार सदस्य घोडेवाही,मा.निर्दोष वाढणकार BSF जवान घोडेवाही,मा.विजय मेश्राम सदस्य घोडेवाहि,मा.संदीप चिमुरकर सामाजिक कार्यकर्ते ,मा.संजय जराते,मा.मनोज शेंडे ,मा.विठोबा बांबोळे ,मा.सुशांत निकोडे, मा.विलास तिवाडे रोजगार सेवक,मा.सुखदेव मोहूले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी उपस्थित बांधवाना संबोधित करताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने यांनी,"युवकांनी शिक्षण क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहून देशाचे नाव जागतिक पातळीवर लौकिक करावे,तरुणांनी खिलाडीवृत्ती जोपासने काळाचि गरज आहे"असे ते म्हणाले.