सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शिवजन्मोत्सव साजरा.
★ छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन.
एस.के.24 तास
सावली : येथे महाराष्ट्राचं आराध्य दैवत,कुळवाडी भूषण,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवजन्मोत्सव म्हंटला की प्रत्येकाच्या घरी आनंदाचा, उत्साहाचा सोहळाच असतो, महाराजांचे विचार,विविध क्षेत्रातील त्यांचं कार्य आणि कर्तृत्व, राजनीतिक कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेचं चातुर्य हे येणाऱ्या पिढ्यांपिढ्यासाठी मार्गदर्शक आणि आदर्श घालून देणारं आहे.
अभिवादन करते समयी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,माजी सभापती प.स.सावली मा.विजय कोरेवार,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,पाणी पुरवठा,आरोग्य व स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर,
महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेवक मा.प्रितम गेडाम,मा.प्रफुल वाळके,मा नितेश रस्से,मा.सचिन संगीडवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.प्रियंका रामटेके,सौ.प्रियंका रामटेके,सौ.सीमा संतोषवार,सौ.राधाताई ताटकोंडावार,माजी नगरसेविका सौ.संगीता गेडाम,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सामाजिक युवा कार्यकर्ते मा.सुनील ढोले, मा.निखिल दुधे,मा.आकाश खोब्रागडे,मा.मृणाल गोलकोंडावार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.