निलसनि पेठगांव येथे कॅन्सर ग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : दिनांक,१३ फेब्रुवारी २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे ग्राम काँग्रेस कमिटी निलसनि पेठगांवचे अध्यक्ष मा.अरुण येडमलवार,माजी उपसरपंच मा.ज्ञानदेव बारसागडे यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.
मौजा.नीलसनी पेठगांव गावातील कॅन्सरग्रस्त रुग्ण भाऊराव शामराव वासेकर वय ५६ वर्षे हे घरातील कर्तबगार कुटुंब प्रमुख असून बऱ्याच दिवसापासून प्राथमिक उपचार करीत होत्या परंतु वारंवार त्यांना अस्वस्थ जाणवत होते.
उपचारदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.
सदर आर्थिक मदत देतानाग्राम काँग्रेस कमिटी निलसनि पेठगांवचे अध्यक्ष मा.अरुण येडमलवार,माजी उपसरपंच मा.ज्ञानदेव बारसागडे,माजी उपसरपंच मा.नारायण वासेकर,मा.श्रीराम मडावी आदी उपस्थित होते.