टायगर ग्रुप चांरगाव यांच्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चांरगाव या गावात साजरी. ★ टायगर ग्रुप चांरगाव तर्फे महाप्रसादाचे आयोजन.

टायगर ग्रुप चांरगाव यांच्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चांरगाव या गावात साजरी.


★ टायगर ग्रुप चांरगाव तर्फे महाप्रसादाचे आयोजन.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील चारगांव या गावात  टायगर ग्रूपतर्फे महाराष्ट्राचं आराध्य दैवत,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 



या कार्यक्रमात  उपस्थीत सरपंच सौ.ज्योती बहिरवार,उपसरपंच मा.राजेश्वर  वालके, पोलिस पाटील प्रवीण तलांडे,आकाश बुर्रीवार,लक्ष्मण बुर्रीवार, राजु बुर्रीवार, उल्हास डोंगरे, सिंधुताई डोंगरे, उज्वला डोंगरे,सरला डोंगरे,आर्यन डोंगरे टायगर ग्रुप तालुका प्रमुख, मोसम बुर्रीवार याच्या हस्ते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


संपूर्ण देशात शिवजन्मोत्सव म्हंटला की मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.व टायगर ग्रूप तर्फे महाप्रसादाचे कार्यक्रम  आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला.


 या कार्यक्रमाचे आयोजन टायगर ग्रुप चांरगाव अध्यक्ष, हेमंत बुर्रीवार,चेतन देशमुख,यश डोंगरे,दयाशील वाकडे, प्रज्वल डोंगरे, मंगेश बुर्रीवार,पियुष बुर्रीवार सर्व टायगर ग्रुपचें सदस्य उपस्थित होते

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !