दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप शिबीर संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण जिल्हा परिषद चंद्रपूर व समेकित क्षेत्रीय, कौशल्य विकास, पुर्णवास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, सी. आर. सी. नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती मुल द्वारा जि. प. मुल/मुले प्राथमिक शाळा मुल येथे दिनांक १६/०२/२०२४ रोज शुक्रवार ला शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले.
विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सुयोग्य व संचार मुक्त वातावरणात शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहात आणणे, विशेष गरज असणाऱ्या मतिमंद,बहु विकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, कर्णबधिर, अंध, लेप्रोसीक्यू, डॉफिरम मस्कुलर, डी. ऑसिड विक्टम असलेल्या दिव्यांग विदयार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या मापानुसार साहित्य उपलब्ध झाल्यास सुलभपणे वर्गात बसता येईल त्याअनुषंगाने सी. आर. सी. नागपूर यांच्या पथका कडून ADIP योजने अंतर्गत तपासणी करण्यात आली.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप शिबीरा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुल ,सावली,सिंदेवाही,नागभिड,ब्रम्हपुरी,पोंभुर्णा,गोंडपिपरी असे सात तालुक्यातील १५४ विद्यार्थ्यांची नोंदणी व मोजमाप करून साहित्य साठी शिफारस केली.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मोजमाप व तपासणी करीता सी.आर. सी.नागपूर येथून तज्ञ डॉक्टर एल.अनुरुपा,डॉ.माधुरी कांबळे,डॉ.प्रफुल आंबटकर अस्थि तज्ञ चंद्रपूर डॉ.कुशवाहा,संजय पुसाम,मोहमद अस्लाम,डॉ.उराडे,साॅयक्लाजिस्ट शुभांगी झाडे उपस्थित होते.
सदर शिबीर आयोजित करण्यासाठी समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक फकिरा राठोड सर ,गणेश राखडे सर,पं.स.मुलचे गटशिक्षणाधिकारी मा. वर्षा फुलझले यांनी प्रयत्न केले तसेच समावेशित शिक्षण टिम मुलचे तालुका समन्वयक संतोष सोनवणे, विवेक डांगे, विशेष शिक्षक ईश्वर लोनबले,यशवंत शेट्टे,निलेश शेणमारे, स्वप्नील मेश्राम, तंत्रस्नेही रवि मडावी,विजय वाडगुरे,व सर्व तालुका समन्वयक,सर्व तालुका विशेष शिक्षक यांनी शिबीर यशस्वी करीता योगदान दिले.