नागपूर शहरात आदिवासी गटातून आरक्षणासाठी गोवारी समाजाचा एल्गार ; चार तासा पासून चक्का जाम.
एस.के.24 तास
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात सोमवारी दुपारी १ वाजतापासून गोवारी समाज बांधवांनी आदिवासी गटातून आरक्षणासाठी संविधान चौकात रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. येथील चारी बाजूंनी आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे.
नागपुरातील संविधान चौकात गोवारी समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यावे,या मागणीसाठी गेल्या ११ दिवसापासून समाजाचे ३ तरुण आमरण उपोषणावर बसले आहे. सरकारने या उपोषनाची काहीही दाखल घेतली नाही.
सरकारी पातपिवर आरक्षणाबाबत कुठलीही हालचाल नसल्याने, सोमवारी विदर्भासह राज्यातील विविध भागातून हजारो गोवारी आदिवासी बांधव संविधान चौकात पोहोचले.शहराचा महत्वाचा रस्ता असलेल्या संविधान चौकातून चार ही बाजूची वाहतूक बंद केली.
दुपारी १ वाजतापासून वाहतूक बंद असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. उपोषणकर्त्यानी आता आश्वासन नको अध्यादेश आणा असे निर्णय घेतल्याने पोलीस आणि प्रशासनाची आंदोलकांना हाताळण्यास दमछाक होत आहे.