आपले सरकार सेवा केंन्द्र,सिएसी केंन्द्र प्रगती काॅम्यूटर एज्यूकेशन मुल ; थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी.

आपले सरकार सेवा केंन्द्र,सिएसी केंन्द्र प्रगती काॅम्यूटर एज्यूकेशन मुल ; थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी.


ममता गोजे - शहर प्रतिनिधी


मुल : येथील आपले सरकार सेवा केंन्द्र,सिएसी केंन्द्र प्रगती काॅम्यूटर एज्यूकेशन मूल थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती शुक्रवार ला साजरी करण्यात आली.याप्रसंगी मूल शहरातील प्रेस क्लब चे अध्यक्ष दीपक देशपांडे, विजय सिद्धावार,प्रकाश  चलाख,कुमुदिनी भोयर,व तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,युवराज चावरे इतर सदस्यांच्या प्रमुख  उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन सोहळा पार पडला.

या सोहळ्याचे सुत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रमोद मशाखेत्री यांनी केले.यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला.महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते.असे प्रतिपादन प्रेस क्लब चे अध्यक्ष,दीपक देशपांडे यांनी केले.


संत महंतांच्या शिकवणुकीचा खरा फायदा विदर्भाच्या विकासासाठी कसा करायचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा विचार करीत त्यांची जयंती शासकीय स्तरावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यस्तरावर मनवल्या जात नसल्याची खंत विजय सिद्धावार यांनी आपल्या वक्तव्यातून पुढे मांडली.


युवराज चावरे यांनी संतांच्या भूमीत त्यांच्या आदर्श शिकवणुकीचा विचार करीत अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल मशाखेत्री कुटुंबियांचे कौतुक करीत खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न हा स्तुत्य प्रयत्न आहे असे मत व्यक्त केले.


" स्वच्छता जिथे - ईश्वराचा वास तिथे "  हा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांची आज जयंती..!


संत गाडगेबाबा : - श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ समाजसुखासाठी अविरत श्रमसाधना हेच गाडगे बाबांचे अभंग होते. बाबांनी श्रम आणि सेवा, श्रम आणि संस्कार, श्रम आणि पूजा, श्रम आणि अभिषेक, श्रम आणि अभंग यांची घातलेली सांगड म्हणजे समाजसुखातून ईश्वरशक्तीचा समाजोद्धार हाच बाबांच्या श्रमसंस्कृतीचा मूलमंत्र होता. बाबांसारख्या एका निरक्षर माणसाच्या मनात स्वयंप्रेरणेतून समाजोद्धाराची एवढी समर्पित भावना निर्माण होते,यातच बाबांच्या मोठेपणाचे सार सामावलेले आहे. बाबांचे सारे जीवनच श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा एक आदर्श वस्तुपाठच आहे.


खरेखुरे देवदूत : - 


बाबांनी देवापुढे हात जोडून प्रार्थना करीत बसण्यापेक्षा हातात खराटा घेऊन सर्वत्र स्वच्छतेचा सुगंध पसरविला. देवाला अभिषेक घालण्यापेक्षा महारोग्याला आंघोळ घालून अंगभर वस्त्रे दिली. देवापुढे मिष्टान्नाचा नैवेद्य ठेवण्यापेक्षा हजारो गरिबांना जेवण दिले. देवाला भरजरी कपड्याने नटविण्यापेक्षा ऋणमोचनला हजारो गरिबांना घोंगडी व बायकांना लुगडी दिली.


देवाची सुंदर मंदिरे बांधण्यापेक्षा ठिकठिकाणी रोगी व वारकरी लोकांच्या सेवेसाठी कोट्यवधीच्या धर्मशाळा बांधल्या. गोरगरीबांची सेवा हीच खरी देवाची पूजा बाबा मानत होते. त्यांना लक्ष्मी आणि सरस्वतीचे वरदान लाभले नाही, मात्र गरिबांच्या दु:खासाठी तळमळणारे मन व त्यांच्या सेवेसाठी राबणारे हात मात्र लाभले. गरिबांचे दुःख दूर करीत फिरणारे गाडगेबाबा हेच खरे देवदूत होते.


या शिबिराचे निमित्ताने आयुष्यमान भारत कार्ड ,आभा कार्ड, विश्वकर्मा योजना, पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना व विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना व समाजातील इतर लाभार्थ्यांना मोफत नोंदणी ,अर्ज भरुन देण्यात आले.या शिबिरात शेकडो लाभार्थी सहभागी झाले.


आणि या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराचे आयोजनाचे कोडकौतुक केले गेले.कार्यक्रमाला प्रगती काॅम्यूटर संचालीका वैशाली चुनारकर मशाखेत्री, जीवतेाडे,डांगे,लाकडे,ठाकरे,चटकले,मालनबाई, गटूवार,आधार संचालक पराग खोबाग्रडे, पठाण,कोंडावार,शेख,मंगेश व प्रगती काॅम्यूटर येथील मंडलवार,विवेक तसेच सेतू केंन्द्रतील कर्मचारी उपस्थीत होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !