नाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी ; पाचव्या सत्रात कवयित्री " प्रतिभा सुर्याराव " विजयी.

नाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी ; पाचव्या सत्रात कवयित्री " प्रतिभा सुर्याराव " विजयी.


एस.के.24 तास


गडचिरोली : स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता " हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला " आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी " म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

      

या उपक्रमाचे पाचवे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील  कवयित्री प्रतिभा प्रविण सुर्याराव यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या " डोळे भरून आले तरी " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

       

सौ.प्रतिभा सुर्याराव या नवोदित  कवयित्री असून त्या अंबरनाथ (पुर्व) जिल्हा - ठाणे येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना राज्यस्तरीय काव्यरत्न व काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

        

 या पाचव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  पुरुषोत्तम लेनगुरे, लीना देगलूरकर, सुनील मंगर कु.तनुजा भोयर,प्रभाकर दुर्गे, हरिष नैताम, जितू निलेकार, प्रशांत गणवीर,संगीता रामटेके,मुर्लीधर खोटेले, अनुराग मुळे - प्रतिभा सुर्यराव, कृष्णा कुंभारे,पी.डी.काटकर,ज्योत्स्ना बन्सोड, बाबाजी व्ही.हुले, प्रब्रम्हानंद मडावी,अंगुलीमाल मायाबाई उराडे, वंदना मडावी, प्रेमिला अलोने, मनोहर दुधबावरे, तुळशीराम उंदीरवाडे, संजय बन्सल, सत्तू भांडेकर,चरणदास वैरागडे,संगीता ठलाल, उपेंद्र रोहनकर,राजरत्न पेटकर, मिलिंद खोब्रागडे, प्रिती चहांदे,सुजाता अवचट,लता शेंद्रे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.


या पुरस्काराचे वितरण नाट्यश्री च्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !