युवकांनी उच्च शिक्षित होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. - नितीन गोहने
★ विरखल वासियांनी दिली तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आदरांजली.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :- ०३ फेब्रुवारी २०२४ तालुक्यातील मौजा.विरखलं येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यस्मरण सोहळ्या व तथा सर्व संत स्मृती मानवता दिनानिमित्य अभिवादनाचा कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळ,विरखलं व समस्त विरखलं वासीय जनतेतर्फे आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक आहेत.तुकडोजी महाराजांनी संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, समाज सुधारणा,शिक्षण क्षेत्र, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य केले.त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठे योगदान आहे.तुकडोजी महाराज त्त्वज्ञानात्मक ज्ञान फार होते. खेड्यांचा विकास झाला.
तर देशाचा विकास होईल,अशी त्यांची धारणा होती.अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच संत स्मृती मानवता दिनाचे औचित्य साधून पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य व जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी मा.पांडुरंग पाटील तांगडे,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, माजी सरपंच मा.मुखरू पाटील निकुरे,सरपंच विरखल मा.मुक्तेश्वर आभारे,उपसरपंच सौ.दीपमाला निकुरे,मा.रेमसू पाटील निकुरे,पोलीस पाटील मा.गंडाते,मा.ईश्वर गंडाते,मा.गोविंदा बकाल,मा.लालाजी मुरांडे, तसेच गुरुदेव सेवा मंडळ विरखलचे अध्यक्ष मा.केवळरामजी आत्राम,उपाध्यक्ष मा.खोजिंद्र नवघडे,सचिव उमाकांत गंडाते,सहसचिव मा.नेताजी येलोरे,मा.भगवान सहारे,मा.भास्कर भुजे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व समस्त विरखलवासिय जनता मोठ्या संखेने उपस्थित होते.