निलज येथे शिवजयंती निमीत्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; विविध तज्ञ डाॅक्टरांची उपस्थिती.

निलज येथे शिवजयंती निमीत्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; विविध तज्ञ डाॅक्टरांची उपस्थिती.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१८/०२/२४ नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्याची तपासणी व रोगाचे निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील शिवजन्मोत्सव समीती, युवा विकास मंच व महिला मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन दि.१९फेब्रु. रोजी सकाळी ९-०० ते १२-००या कालावधी पर्यंत आयोजित केले आहे.तसेच निलज कला महोत्सव - २०२४ चेआयोजन सायंकाळी ७-०० वाजता करण्यात आले आहे. 


या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सदर शिबीरात ख्रिस्तानंद रुग्णालयाचे संचालक फादर कुरीयन, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.शिशिर वंजारी,सर्जन डॉ.नितेश जुमनाके, अस्थिरोग तज्ञ डॉ सुशील चुऱ्हे, स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रीती यादव, फिजीशियन डॉ‌.विवेक नाकाडे, दंत चिकित्सक डॉ.स्नेहल वारजूरकर , वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत भुरले, फिजीशियन डॉ.खुशबु मेश्राम, पॅथालाॅजिस्ट चारूलता चौधरी, बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ( बि.फार्म) राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.महाजन सर व विद्यार्थी ह्या शिबीरात उपस्थित राहुन आपली सेवा देणार आहेत. 


तरी या शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७-०० वाजता पारंपरिक वेशभूषेसह शिवाजी महाराज पालखी सोहळा,सकाळी ९-००ते १२-०० मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर,दुपारी १२-०० वाजता वक्तृत्व स्पर्धा,दुपारी १-०० वाजता पुरुषांसाठी व्हाॅलिबाॅल स्पर्धा,दुपारी २-०० वाजता महिला व मुलींसाठी संगीत खुर्ची- विजेत्यांना माहेरची साडी,दुपारी ३-०० वाजता - रांगोळी स्पर्धा व गीतगायन स्पर्धा, सायंकाळी ४-०० वाजता शिवजन्मोत्सव पाळणा, सायंकाळी ७-०० वाजता कला महोत्सव होणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !