शिवाजी महाराज म्हणजे नीती,प्रशासन व समाजकारणाचा आदर्श जयंती उत्सव. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे

शिवाजी महाराज म्हणजे नीती,प्रशासन व समाजकारणाचा आदर्श जयंती उत्सव. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगाव २१ फेब्रु.२४ शिवाजी महाराज खरा लोककल्याणकारी राजा होता.रयतेच्या कल्याणासाठी सदैव झटणारे,शेतक-यांना सा-या सुविधा प्रदान करणारे ते छत्रपती होते, म्हणून शिवाजी महाराज म्हणजे नीती,प्रशासन आणि समाजकारणाचा आदर्श खरा होय " असे विचार प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी मांडले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बोलत होते.

      

कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.डाॅ दुपारे मॅडमनी शिवघोषणा देऊन व डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्रामांनी घोषणा देत छत्रपतीचा जयजयकार करण्यात आला.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,मेजर प्रा विनोद नरड, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ तात्या गेडाम, डॉ असलम शेख, डॉ मोहन कापगते,डॉ किशोर नाकतोडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ हर्षा कानफाडे, डॉ रतन मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,डॉ सुनिल चौधरी,डॉ योगेश ठावरी डॉ मोहूर्ले,प्रा परकरवार,प्रा खोब्रागडे, प्रकाश गायगवळी,रोशन डांगे,प्रज्ञा मेश्राम,आलोक मेश्राम,राजू मेश्राम, शशिकांत माडे, जयंत महाजन, दत्तू भागडकर, सुषमा राऊत, निनावे इ.मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

      

कार्यक्रमाचे संचालन डॉ.धनराज खानोरकरांनी तर आभार डॉ.युवराज मेश्रामांनी मानले यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मा,प्रा धिरज आतला, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !