धोकादायक पुलाचे आणि रस्त्याचे कधी होणार बांधकाम सुरू ; जनतेत तीव्र संताप.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०२/२४ ब्रह्मपुरी विधानसभा व चिमूर विधानसभा या अडकित्याच्या तावडीत सापडलेला ब्रह्मपुरी ते अ-हेरनवरगाव भूतीनाल्यावर असलेला पुल व रस्ता बऱ्याच वर्षापासून नादुरुस्त असून वाहतुकीसाठी तो जीवघेणा ठरू शकतो.अ-हेरनवरगाव, पिंपळगाव, भालेश्वर , नांदगाव या परिसरातील जनतेने सदर पूल दुरुस्त करावा आणि त्याला लागूनच जास्त उंचीच्या दुहेरी मार्गाचे पूल बांधकाम करण्यात यावे अशी वारंवार मागणी केली प्रशासनाकडे केल्या गेली.
परंतु जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे असे दिसून येते. नुकत्याच आलेल्या पुरामुळे पुलाच्या एकाबाजूला मोठा खड्डा पडला असून प्रशासनाच्या संबंधित बांधकाम विभागानेअजून पर्यंत एक ट्रॉली मुरूम टाकून तो बुजविला नाही. त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
तसेच ब्रह्मपुरी ते अ-हेरनवरगाव सतत वाहतूक असणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.सदर खड्डेमय रस्त्यावर साधा मुरूम टाकून ते बुजविण्याचे धाडस प्रशासनाने केले नाही.
तरी भूती नाल्यावर जास्त उंचीचा वाहतुकीसाठी दुहेरी पूल आणि ब्रह्मपुरी ते अ-हेरनवरगाव रस्त्याचे रुंदीकरण करून बांधकाम करण्यात यावे अशी ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव,नांदगाव,भालेश्वर,पिंपळगाव या परिसरातील जनतेची मागणी आहे.पुल आणि रस्त्याचे रुंदीकरण बांधकाम शक्य तितक्या लवकर सुरू झाले नाही तर रस्ता रोको यासारखे शस्त्र जनतेला हाती धरावे लागेल.