विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले.

 


विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले.


ग्राउंड रिपोर्टिंग - सुरेश कन्नमवार मुख्य संपादक


वाशिम : तालुक्यातील एकबुर्जी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीतून गावातील काही घरांना खासगी नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. २४ फेब्रुवारीला रात्री अज्ञात इसमाने विहिरीत विषारी औषध टाकले.आज २५ फेब्रुवारी रोजी सकाळी नळाला पाणी आले असता ते पिवळसर आले व पाण्याचा वास येत असल्यामुळे नागरिकांना संशय आला.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


प्राप्त माहिती नुसार, वाशिम तालुक्यातील एकबुर्जी गावातील चाळीस ते पन्नास घरांना खासगी नळ योजनेतून पाणी पुरवठा केला जातो.आज सकाळी ९ वाजता नळांना पिवळे पाणी आल्याने नागरिकांना पाईप लाइन मध्ये काही तरी बिघाड झाल्याचा संशय आला.इतक्यात भगवान सीताराम इढोळे हे शेतात गेले असता त्यांना विहिरीत विषारी औषधाच्या बाटल्या आढळून आल्याने पाण्यात कुणीतरी विषारी औषध टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती ११२ वर फोन करून पोलिसांना दिली. 


घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार बांगर, पोलीस उप निरीक्षक शेटे पोलीस कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचली.सोबतच महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले होते.


सुदैवाने नागरिकांनी नळाचे पाणी वापरले नसल्याने मोठा अनर्थ टळला.प्रशासनाने तातडीने समय सूचकता दाखवून विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. 


तात्पुरत्या स्वरूपात गावातील नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा दिला जात आहे.घडलेला प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून त्या अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !