पात्र असूनही घरकुल योजनेपासून डावलल्याने पंचायत समिती समोर बेमुदत संप.
★ सर्व पक्षीय नेत्यांनी दिले ठिय्या आंदोलन स्थळी दिली भेट.
एस.के.24 तास
सावली : पात्र असूनही घरकुलापासून वंचित ठेवले असा आरोप करीत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी जीबगाव येथील लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी भिक मांगो आंदोलन करण्यात आले त्यावेळी संतोष सा तगडपल्लीवार माजी सभापती जि प चद्रपुर,प्रकाश पा गडमवार
श्रावण बाळ निराधार योजना अध्यक्ष सावली,सतीश बोम्मावार भा ज पा महामंत्री बोम्मावार तथा नगरसेवक न प सावली,विलास यासलवार माजी नगराध्यक्ष सावली,रविंद्र बोलीवार माजी सभापती प स सावली,रोशन बोरकर वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष,आनंदराव ठिकरे माजी उपसरपंच उसेगांव,आदिची उपस्थित राहुन दिले ठिय्या आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली. मात्र घरकुल मिळेपर्यंत आणी सरपंच सचिव अधिकारी यांचेवर कार्यवाही होई पर्यंत आंदोलन सुरु ठेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जीबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापुरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही. अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जीबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगमताने आम्ही पात्र असताना डावलले असून अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप करीत सावली पंचायत समितीसमोर कुटुंबासह आंदोलन सुरु आहे.
आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून समजविण्याचा प्रयत्न केला तरी मात्र आंदोलन मागे घेणार नाही,जोपर्यंत सचिव अधिकारी यांचेवर कार्यवाही करुन आमची मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
त्यावेळी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे सांगितले,पण आंदोलक आपली भुमिकेवर ठांब असल्याने,यासंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपला आंदोलन पाठीबा जाहिर करतोय आणी प्रश्न निकाली निघेपर्यंत आपल्या परीवारांना सभोत राहु असे आश्वासन केले आहे.लवर प्रश्न निकाली काढण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.