सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयोजन ; शिबिरात चारशे रुग्णाची नोंद.
★ 154 रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी निवड.
एस.के.24 तास
सावली : 92 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम ला रवाना लायन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर, केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली आयोजित तपासणी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आज 11 फेब्रुवारी 2024 रोजी रविवार ला दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत विश्वशांती विद्यालय सावली येथे आयोजित करण्यात आले होते.
मानव सेवा ही ईश्वर सेवा समजून महावीर इंटरनॅशनल सावली तर्फे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले तेव्हा या शिबिरात एकुण 400 च्या जवळपास रुग्णाची शिबिरात नोंदनी असून तज्ञ डॉक्टर अजय शुक्ला डीन मेडिकल कॉलेज सेवाग्राम व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनात रुग्णाची तपासणी करुन 154 रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.आज लगेचच 92 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.
उर्वरित रुग्णांना दोन दिवसात पाठवणार असून महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली चे आयोजक दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी शिबिर घेऊन सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यांच्या कार्याची तालुक्यात इतरत्र स्तुती केली जात आहे. या शिबिराला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. हा शिबिर यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.