जि.प.शाळा,कळमना येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात संपन्न.
■ उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढईंनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वच्छतेचे पुजारी गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव,अ.भा. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे पुजारी होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व समतेचा दिलेला मूलमंत्र हा आपल्यासाठी फार मोलाचा आहे. त्यांनी दिन, दलित, शोषीत पिडीत घटकांसाठी स्वतःला झोकून दिले. त्यांनी सर्वांना कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्यांनी नुसते गाव स्वच्छ केले नाही तर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक, शैक्षणिक जनजागृती केली.
अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यावर प्रहार केला. त्यांची शिकवण सर्वांनी अंगीकारुन प्रगती करावी असे आवाहन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत हर्षल अटकारे,मुख्याध्यापिका दुधे मडम, पेंदोर सर, गोखरे मॅडम, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.