शेतकरी विरोधी भाजपला धडा शिकविण्याकरिता एकत्र येऊन कार्य करा ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कार्यकर्त्यांना सूचना. ★ धानोरा तालुका काँग्रेस बूथ मेळावा संपन्न.

शेतकरी विरोधी भाजपला धडा शिकविण्याकरिता एकत्र येऊन कार्य करा ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कार्यकर्त्यांना सूचना.


★ धानोरा तालुका काँग्रेस बूथ मेळावा संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष असून सत्तेत आल्यापासून भाजपने नेहमी शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा काम केलेला आहे. विविध करांच्या माध्यमातून, बी बियानाच्या दरात वाढ करून असेल किंवा जीवनवश्यक वस्तूच्या दरात वाढ करून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लचके तोडण्याचे काम भाजप सरकार करित आहे.

अश्या ह्या हुमकूमशाही सरकारला धडा शिकवण्याची आता वेळ आली असून काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गाफिल न राहता किंवा कोणत्याही आमिषाला बडी न पडता लोकशाही टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जोमात कार्याला लागा अश्या सूचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या आहे.धानोरा तालुका काँग्रेस द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि.प्र.डॉ.नामदेव किरसान,माजी आम.नामदेव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी. जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे.


नगराध्यक्ष पौर्णिमा सय्याम, महिला तालुकाध्यक्ष शेवंता हलामी, प्रशांत कोराम, मुबारक सय्यद, राजू जीवानी, सीमा थूल, देवांगणी चौधरी, यामिना पेंदाम, राजू मोहुर्ले, नितेश राठोड, महेश जिलेवार, गणेश कुळमेथे , संदीप राऊत, महेंद्र उईके, सदूकर हलामी, गणेश कुळमेथे, जयपाल मार्गीये, प्रभाकर उसेंडी सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !