एस.के.24 तास
गडचिरोली : दि.17-2-2024 भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे यांच्या मान्यतेनुसार भाजपाचे विमुक्त भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे यांनी जिल्हा आघाडीची कार्यकारणी घोषित केली.
त्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश मांडवगडे,जिल्हा उपाध्यक्ष पदावर कान्हूजी लोहंबरे, रमेश हेमके, सौ मीनाक्षी गेडाम, रेवन मेश्राम, सौ गीता दद्देकार, रामन्ना बोनकुलवार, जिल्हा महामंत्रीपदी धर्मदास नैताम, बालकिसन चिंतल,उत्तम शेंडे,साईनाथ हजारे, बापूजी उईके, जिल्हा कोषाध्यक्षपदी रमेश मांडवगडे, जिल्हा सचिव सर्वेश्वर मांडवकर, प्रकाश मारभते,सुधीर आखाडे, मनोज काळे, राजेश साळवे, सौ. पौर्णिमा आत्राम,ज्योती बागडे आणि 51 सदस्य मिळवून 71 जणांची कार्यकारणी घोषित करण्यात आलेली आहे.
या निवडीबद्दल खासदार अशोक नेते,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार क्रिष्णा गजबे,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे,लोकसभा समन्वयक, प्रमोद पिपरे,माजी नगराध्यक्षा,योगिता पिपरे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.