छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन.
नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ १ विभागाचे नमुंमपा उपायुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे,
वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व अरविंद शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज व अजय वाळुंज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.