ब्रम्हपुरीतील इन्स्पायर करिअर अकॅडमी ठरत आहे पूर्वविदर्भातील विद्यार्थ्यांना संजीवनी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : इन्स्पायर करिअर अकॅडमी च्या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थी दरवर्षीच कुठल्या न कुठल्या विभागात नोकरी प्राप्त करन्यात यशस्वी होत आहेत हे या अकॅडमीचे विषेश..! याच अकॅडमीतुन एका विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊन यशाला गवसणी घातली आहे. त्याबद्दल शिवजयंतीचे औचित्य साधून इन्स्पायर करिअर अकॅडमीच्या वतीने महेश राऊत याची आरोग्य विभाग मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यशाला खेचून आणायचं असेल तर सात्यत व संयम असायला हवा, या स्पर्धेच्या युगात जिद्द आणी चिकाटी सोबतच संयम असेल तरच तुम्ही यशाला आपलेसे कराल, असे प्रदीपादन मा. अतिष धोटे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तथा इन्स्पायर करिअर अकॅडमी च्या वार्षिक उत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
ब्रह्मपुरीतील इन्स्पायर करिअर अकॅडमी ही भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गेल्या एक दशकापासून संजीवणीचे कार्य करत आहे. आजपर्यंत या अकॅडमीने शेकडो विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली असे आशावादी प्रतिपादन आपल्या अध्यक्षिय भाषणात मा. दीपक सेमस्कर सर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मा.दीपक सेमस्कर सर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतिष धोटे व मा.श्री अनिल प्रधान सर उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून इन्स्पायर करिअर अकॅडमी च्या संचालिका मा. सौ. एकता गुप्ता मॅडम, 'ब्रम्हपुरी दर्पण' साप्ताहिकाचे संपादक मा. भोयर साहेब, लक्ष्मण मेश्राम सर ने. ही. विद्यालय ब्रम्हपुरी व मा. श्री राहुल गावतुरे सर ने. ही. विद्यालय ब्रम्हपुरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु.शीतल भाजीपाले यांनी केले तर प्रास्ताविक विवेक खरवडे सर यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.