जलजीवन मिशन अंतर्गत घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ने.हि.महाविद्यालयाचे सुयश.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,२३ /०२/२४ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) जल जीवन मिशन अंतर्गत ब्रम्हपुरी तालुकास्तरावर घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ने. हि.महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल ठरलेत. 'जल हेच जीवन' या अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ने. हि.महाविद्यालयाची विद्यार्थी कु. शिवानी नागोसे हिने प्रथम पारितोषिक पटकावले, तर शांताबाई भैय्या महिला महाविद्यालयच्या विद्यार्थिनी कु. सुषमा ठुसे व कु. समीक्षा पंडित यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळविले. सदर तिन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली असून त्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाविद्यालयात ,१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पदमाकर वानखडे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. या समयी मराठी विभाग प्रमुख डॉ.धनराज खानोरकर, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.असलम शेख सर, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. रेखा मेश्राम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर, डॉ.दर्शना उराडे व बहुसंख्य प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.