राज्याच्या इतिहासात " प्रगतशील शहर ब्रम्हपुरी " असा नामोल्लेख होणार. - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
★ शैक्षणिक,आरोग्यासह आता क्रीडा क्षेत्रातही चमकणार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०२/२०२४ विद्यानगरी म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराला आता विकासाची चालना देत शहरासह संपूर्ण तालुका व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा विकास साधण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असणार असून राज्याच्या इतिहासात 'प्रगतशील शहर ब्रम्हपुरी' असा नामोल्लेख होणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपुरी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पणाच्या वचनपूर्ती सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड गोविंदराव भेंडारकर
नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा रिताताई उराडे, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी सभापती विलास विखार, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, तहसीलदार उषा चौधरी, न.प.मुख्याधिकारी अर्शिया जुही, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रीकांत कामडी, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी न.प.सभापती महेश भर्रे, बाजार समितीच्या उपसभापती सुनीता तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा,मंगलाताई लोनबले
महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी नगरसेविका लताताई ठाकुर, माजी नगरसेविका निलीमाताई सावरकर, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अण्णाजी ठाकरे, बाजार समिती संचालक संजय राऊत,अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी,शहर काँग्रेस सचिव वकार खान, माजी नगरसेवक मनोज कावळे, निनाद गडे, गोपाल भानारकर, रवी पवार, सोमेश्वर उपासे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व स्वीकारताना सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार लक्षात घेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात गोसेखुर्द प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपये इतका मोठा विकास निधी मंजूर करून घेतला. यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हे जवळपास पूर्णतः सिंचनाखाली येणार आहे. ब्रम्हपुरी शहराला आतापर्यंत शैक्षणिक व आरोग्यनगरी म्हणून संबोधले जात होते. मात्र आता हे शहर क्रीडा क्षेत्रासाठी देखील ओळखले जाणार असेही ते यावेळी म्हणाले.
आज पार पडलेल्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ब्रम्हपूरी तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा (१२ कोटी ३६ लाख रुपये, ब्रम्हपूरी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा(१० कोटी १० लाख रुपये, ब्रम्हपूरी शहरातील क्रिडासंकुलाचा लोकार्पण सोहळा(६ कोटी ६८ लाख रुपये, ब्रम्हपूरी येथील तहसील कार्यालयासमोरील दर्शनीय भागाचे सौंदर्यीकरण करणे(२ कोटी रुपये)
ब्रम्हपूरी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन(२८ कोटी रुपये), ब्रम्हपूरी शहरातील क्रिडा संकुलाम़ध्ये इतर सुविधा तयार करण्याच्या कामाचे भुमीपुजन करणे(१० कोटी ३६ लाख रुपये) या विकासकामांचा यामध्ये समावेश असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद,प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड, तर आभार संतोष उईके यांनी मानले.